joe biden 
ग्लोबल

अमेरिकेला समृद्ध ठेवण्यासाठी काम करावं; बायडेन यांना ट्रम्पनी दिल्या शुभेच्छा

यूएनआय

वॉशिंग्टन : अखेरच्या क्षणापर्यंत आपला हेका न सोडणारे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या प्रशासनाला शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेला सुरक्षित आणि समृद्ध ठेवण्यासाठी नव्या सरकारने काम करावे, असे त्यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात सांगितले आहे.

ट्रम्प यांनी एका व्हिडिओद्वारे अमेरिकी जनतेशी संवाद साधला. त्यांचा हा व्हिडिओ ‘व्हाइट हाऊस’ने प्रसिद्ध केला. ‘भविष्याकडे वाटचाल करताना अमेरिकी नागरिकांनी द्वेषभावना दूर करून एक येणे आवश्‍यक आहे. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मी अनेक आव्हानात्मक लढायांना सामोरे गेलो. याच कारणासाठी तुम्ही मला निवडून दिले होते. तुमच्या गरजा पूर्ण करण्यालाच मी प्राधान्य दिले होते. माझी अध्यक्षपदाची कारकिर्द संपत असताना मी तुमच्यासमोर अभिमानाने उभा आहे. अध्यक्ष म्हणून अमेरिकेची सेवा करणे हा सर्वोच्च सन्मान होता. नव्या प्रशासनाला शुभेच्छा देतो,’ असे ट्रम्प म्हणाले. आपल्या या भाषणात ट्रम्प यांनी बायडेन यांचा अजिबात उल्लेख केला नाही. ६ जानेवारीला कॅपिटॉलवर झालेल्या हिंसाचाराबाबत मात्र ते बोलले. कॅपिटॉलवरील हल्ल्याचा निषेध करताना त्यांनी हा अमेरिकेसाठी काळा दिवस होता, असे ते म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या कारकिर्दीत मिळविलेल्या यशाचा पाढाच ट्रम्प यांनी वाचला. कर कमी करणे, चीनवर वचक निर्माण करणे, ऊर्जेत स्वावलंबित्व मिळविणे, अत्यंत कमी कालावधीत कोरोनाप्रतिबंधक लस तयार करणे यांचा दाखला त्यांनी दिला. आम्ही अमेरिकेला तिची ताकद पुन्हा मिळवून दिली, असा दावाही त्यांनी केला. कोणत्याही देशाविरोधात नव्याने युद्ध सुरु न केलेला मी अनेक दशकांमधील पहिलाच अध्यक्ष असेल, असेही ते म्हणाले. ज्यो बायडेन यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच जाहीर केले होते. शपथविधीपूर्वीच ते फ्लोरीडातील आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

Shaktipeeth Expressway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात 7 जुलैला एल्गार; मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे धरणे, 13 जिल्ह्यांतील बाधित शेतकरी सहभागी होणार!

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची लाय डिटेक्शन टेस्ट होण्याची शक्यता

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

IND vs ENG : 20 चेंडूत अर्धशतक; अभिषेक शर्माने मोडला केएल राहुलचा मोठा विक्रम, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT